पणजी : आगामी बीसीसीआय निवडणुकीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) उमेदवाराची निवड करण्यासाठी आज, दुपारी २ वाजता पर्वरी येथे तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.
बीसीसीआयकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आज रात्री ८ वाजेपर्यंत असल्याने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीतच राष्ट्रीय क्रिकेट संघटनेतील गोव्याचे प्रतिनिधित्व कोण करणार, याचा निर्णय घेतला जाईल.