पणजी : पणजी : गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) अध्यक्षपदासाठी चेतन देसाई गटाचे उमेदवार महेश देसाई व रोहन गावस देसाई गटाचे उमेदवार महेश कांदोळकर यांच्या मध्ये आता थेट लढत होणार आहे. अध्यक्षपदासाठी इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता दोनच उमेदवार रिंगणात आहेत.
गोवा क्रिकेट संघटनेची निवडणूक १६ सप्टेंबर रोजी होणार असून संलग्न क्लब्सचे १०७ प्रतिनिधी भाग घेणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनंत नाईक, परेश फडते, राजेश पाटणेकर, सय्यद माजीक, सुदेश राऊत यानी अध्यक्षपदासाठीचे अर्ज मागे घेतले.
अंतिम उमेदवार पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: महेश देसाई आणि महेश कांदोळकर
उपाध्यक्ष: परेश फडते आणि राजेश पाटणेकर
सचिव: दया पागी, हेमंत पै आंगले आणि तुळशीदास शेट्ये
सहसचिव: अनंत नाईक आणि सुशांत नाईक
खजिनदार: रुपेश नाईक आणि सय्यद माजिक
सदस्य: महेश बेहकी आणि मेघनाथ शिरोडकर