कारवारचे काँग्रेस आमदार सतीश सैल यांना ईडीकडून अटक

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
10th September, 12:14 am
कारवारचे काँग्रेस आमदार सतीश सैल यांना ईडीकडून अटक

जोयडा : कारवार येथील काँग्रेस आमदार सतीश सैल यांना बंगळुरू येथे ईडीने अटक केली. ही अटक ऑगस्ट महिन्यात त्यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्याच्या प्रकरणात झाली आहे.

१३ ऑगस्ट रोजी टाकलेल्या छाप्यात ईडीने तब्बल १.६ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, सुमारे ६.७५ किलो सोने आणि १४ कोटींच्या आसपासची बँक खाती फ्रीज केली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर व्यवहार नोंदी आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

२०१० मधील बेलकेरी बंदरातील अवैध लोहखनिज निर्यात घोटाळा प्रकरणामुळे आमदार सतीश सैल यांचे नाव पुढे आले होते. त्या प्रकरणात त्यांना अटकही केली होती. त्याच तपासाचा भाग म्हणून ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. सतीश सैल यांची चौकशीदरम्यान बंगळुरूमध्ये अटक झाली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ईडीकडून पुढील तपासणी केली जात आहे. 

हेही वाचा