ट्यूशनसाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th September, 12:22 am
ट्यूशनसाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण

वास्को : ट्यूशनसाठी घराबाहेर पडलेल्या आपल्या अल्पवयीन मुलाचे कोणीतरी अपहरण केल्याची तक्रार जेटी येथील एका पालकाने केली आहे. याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी अज्ञातविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीमध्ये शिकणारा चौदा वर्षीय मुलगा सोमवार, ८ सष्टेंबर रोजी शाळेतून आल्यावर दुपारी तीन वाजता ट्यूशनला जातो, असे सांगत घराबाहेर पडला. तथापि, तो सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या घरच्या लोकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, त्याचा शोध लागला नाही. मुलाच्या वडिलांनी मंगळवार, ९ रोजी मुरगाव पोलीस स्थानकात यासंबंधी तक्रार नोंदविली. त्याचे कोणीतरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

मुरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या १३७(२) कलमानुसार व गोवा बाल कायदाच्या कलम ८ नुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक यशवंत रायकर पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा