मतदारसंघ फेररचा, आरक्षण ३० पर्यंत शक्य
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जिल्हा पंचायतीचा कार्यकाळ ७ जानेवारी २०२६ रोजी संपत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. महिनाअखेरी नाताळ असल्यामुळे जिल्हा पंचायत निवडणूक डिसेंबरच्या मध्यावर होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या तयारीसाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. पंचायत संचालनालयातर्फे करण्यात येणारी मतदारसंघ फेररचना व आरक्षण विभागणी आता राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार कार्यालय तसेच बीएलओमार्फत केली जाणार आहे. जिल्हा पंचायत मतदार संघांची फेररचना ३० सप्टेंबरपर्यंत करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. राज्यात जिल्हा पंचायतीचे एकूण ५० मतदारसंघ आहेत. दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी २५ मतदारसंघ आहेत.
सध्याचे मतदारसंघ व आरक्षण
उत्तर गोवा
धारगळ (अनुसूचित जाती); तोरसे, शिवोली, हणजूण, ताळगाव, केरी (महिला); हळदोणा, पेन्ह दी फ्रान्स, नगरगाव (ओबीसी महिला); कळंगुट, रेईश मागूश, खोर्ली, लाटंबार्से, कारापूर-सर्वण (ओबीसी); पाळी (अनुसूचित जमाती)
दक्षिण गोवा
गिर्दोली, कुडतरी, धारबांदोडा, सांकवाळ (महिला); कुर्टी, कोलवा (ओबीसी महिला), बेतकी- खांडोळा, वेलिंग -प्रियोळ, वेळळी, बाणावली (ओबीसी); शिरोडा, कुठ्ठाळी (अनुसूचित जमाती); नुवे, पैगीण (अनुसूचित जमाती महिला).