तिघे जखमी गोमेकॉत दाखल
फोंडा : बोरी येथे शनिवारी संध्याकाळी दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील सहा जखमी झाले. कार व मिक्सरवाहू ट्रक यांच्या दरम्यान झालेल्या या अपघातात कारमधील तिघा जखमींना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.
मिक्सरवाहू ट्रक (क्र. जीए ०७ एन १३६०) मडगावच्या दिशेने जात होता. तर तेलंगणा येथील नोंदणीकृत कार (टीएस ०७ जीटी ५६७२) ही फोंड्याच्या दिशेने येत होती. बोरी येथे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
अपघातात रघुराम (४५, रा. वार्का, मूळ तेलंगणा), हायमा संविता (१२), माया अक्षय देशपांडे (३९), साई कृष्णा (११), अभिमा देशपांडे (१३ ), सात्विक रेड्डी (१२, सर्व रा. मडगाव मूळ तेलंगणा) हे जखमी झाले. यापैकी हायमा, साई कृष्णा व माया यांना अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन पंचनामा केला.