वाळपईत ११ दिवसीय बाप्पाला थाटात निरोप

मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती


07th September, 12:09 am
वाळपईत ११ दिवसीय बाप्पाला थाटात निरोप

वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले गणेशभक्त.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाला अनंत चतुर्दशी दिवशी, शनिवारी मिरवणुकीने निरोप देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मिरवणुकीत भजनीपथक होते.
यंदा गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी लॉटरीचा ड्रॉ काढण्यात आला. तत्पूर्वी मंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. शनिवारी सायं. ६ च्या सुमारास हनुमान मंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. फातिमा कॉन्व्हेंट, गोवा बागायतदार, पोलीस स्थानक या मार्गे मिरवणूक नेण्यात आली. मिरवणुकीत गजर, भजन, दिंडी यांचे आयोजन करण्यात आले होते. 

हेही वाचा