गोवा : महिला होमगार्डचे नशीब फळफळले

लॉटरीतून मिळाला टू बीएचके आणि ३५ लाख : संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरीचा ‘प्रसाद’

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
07th September, 11:22 pm
गोवा : महिला होमगार्डचे नशीब फळफळले

पणजी : ५०० रुपयांच्या एका लॉटरीमुळे महिला होमगार्डचे (home gaurd) नशीबच पालटले. उन्हातान्हात सेवा देणाऱ्या या महिलेला चक्क टू बीएचके फ्लॅट आणि ३५ लाख रुपये रोख बक्षीस स्वरूपात मिळणार आहे.

सांगे (Sanguem) पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या होमगार्ड अमिता संदीप काकोडकर (वाडे-सांगे) असे या भाग्यवान महिलेचे नाव आहे. सांगे येथील संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरीचे पहिले इनाम त्यांनी जिंकले आहे. ०९४८७९ या क्रमांकाच्या लॉटरीचे तिकीट त्यांनी खरेदी​ केले होते. टू बीएचके फ्लॅट आणि ३५ लाख रुपये रोख असे या बक्षिसाचे स्वरूप आहे.

हे बक्षीस जिंकल्याबद्दल या महिला होमगार्डचे पोलीस दलासह समाजातील विविध घटकांतून अभिनंदन होत आहे. 

हेही वाचा