
पणजी : गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (जीएसपीसीबी) व्यवसाय सुरू करण्याचा परवाना नसल्यामुळे कांपाल येथील बसेरा रेस्टॉरंट आणि डॉर्मिटरी सील करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी तिसवाडी मामलेदारांच्या निर्देशानुसार, तलाठीने केली.
या प्रकरणी पर्वरी येथील कृष्णा पंडित यांनी जीएसपीसीबीकडे १८ आॅगस्ट २०२५ रोजी तक्रार दाखल करून बसेरा रेस्टाॅरंटकडे मंडळाचा परवाना नसल्याचा दावा केला होता. या संदर्भात मंडळाने चौकशी केली असता, त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्याचा परवाना नसल्याचे समोर आले. मंडळाचे सदस्य सचिव संजीव जोगळेकर यांनी २५ आॅगस्ट रोजी निर्देश जारी करून रेस्टाॅरंट बंद करण्यास सांगितले. या संदर्भात मंडळाने तिसवाडीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करून कृती अहवाल सादर करण्यास सांगितले. उपजिल्हाधिकाऱ्यांनी तिसवाडी मामलेदारांना कारवाई करण्यास सांगितले. तिसवाडी मामलेदारांच्या निर्देशानुसार, तलाठीने मंगळवारी कांपाल येथील बसेरा रेस्टॉरंट आणि डॉर्मिटरी सील केले.