मार्ना-शिवोली येथे रस्त्यावर वडाची फांदी पडून दोन विद्यार्थी जखमी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
मार्ना-शिवोली येथे रस्त्यावर वडाची फांदी पडून दोन विद्यार्थी जखमी

पणजी : गोव्यातील (Goa)  मार्ना-शिवोली (Siolim) येथे मुख्य रस्त्यावर २०० वर्षे जुन्या वडाची (Banyan tree)  वाळलेली मोठी फांदी पडून दोन विद्यार्थी (Student) जखमी झाले. फांदी रस्त्याच्या मधोमध पडल्याने; मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. 

म्हापसा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता वाहतुकीस मोकळा केला. वडाची फांदी पडली तेव्हा शाळेतील विद्यार्थी या रस्त्याने जात होते. दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा