कळंगुटमध्ये आर्थिक व्यवहाराच्या वादातून सुरीहल्ला

पोलिसांकडून संशयिताला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st March, 11:44 pm
कळंगुटमध्ये आर्थिक व्यवहाराच्या वादातून सुरीहल्ला

म्हापसा : कळंगुट येथील बागा सर्कल जंक्शनजवळ आर्थिक व्यवहाराच्या वादातून करण मागरे (२४, रा. कळंगुट व मूळ महाराष्ट्र) या स्पाच्या कामगारावर सुरीहल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी समीर सिंग रजपूत (रा. कळंगुट व मूळ राजस्थान) याला अटक केली.

ही घटना रविवार, १ मार्च रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास घडली. याप्रकरणी जखमीचा मित्र सुनील राठोड यांनी पोलिसांत तक्रार दिली. करण मागरे हा संशयित आरोपी समीर सिंग रजपूत याला पैसे द्यायचा होता. त्यामुळे दुपारी बागा सर्कलजवळ हे दोघे या आर्थिक व्यवहाराच्या वाटाघाटीसाठी आले. करणने आपल्या सोबत फिर्यादीला आणले होते. पैशांच्या व्यवहारातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संशयिताने करणला शिवीगाळ करत गंभीर परिणामाची धमकी दिली. नंतर करण जाण्यासाठी माघारी परतला तेव्हा संशयिताने अचानक त्याच्यावर मागून सुरीहल्ला केला. सुरीचे दोन वार करणवर करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला कांदोळी आरोग्य केंद्रातून गोमेकॉत पाठवण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी लगेच कारवाई करत संशयिताला पकडून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ११८

(२) व ३५२ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वजीत ढवळीकर हे करीत आहेत. 

हेही वाचा