आठ पोलीस अधीक्षकांची बदली

संतोष देसाई दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
आठ पोलीस अधीक्षकांची बदली

पणजी : गोवा पोलीस खात्यात हल्लीच बढती झालेल्या आठ अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यात संतोष देसाई यांची दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, तुषार वेर्णेकर यांची पोलीस मुख्यालय तर राजन निगळे यांची दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकात बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश कार्मिक खात्याचे अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी जारी केला आहे.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संतोष देसाई यांची दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कुशावती जिल्हा अधीक्षक पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. तुषार वेर्णेकर यांची पोलीस मुख्यालय अधीक्षकपदी बदली केली आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा उपअधीक्षक पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. राजन निगळे यांची दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकात (एसीबी) बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे एसीबी उपअधीक्षक पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला. राजेंद्र राऊत देसाई यांची बिनतारी संदेश अधीक्षकपदी बदली केली. जिवबा दळवी यांची मोटार वाहन विभागाच्या (एमटी) अधीक्षकपदी बदली केली. त्यांच्याकडे गुन्हा शाखेच्या उपअधीक्षक (१) पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला. राजेश कुमार यांची किनारी पोलीस विभाग अधीक्षकपदी बदली केली आहे. नूतन वेर्णेकर यांची मानव तस्करी विरोधी पथकाच्या अधीक्षकपदी बदली केली आहे. त्यांच्याकडे पिंक पोलीस अधीक्षक पद आणि मानव तस्करी विरोधी पथकाचे उपअधीक्षक पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला. प्रवीणकुमार वस्त यांची पर्यटन पोलीस अधीक्षक पदी बदली केली. त्याच्याकडे मुख्यालयाचे उपअधीक्षक (परवाना आणि खरेदी) पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

शेखर प्रभुदेसाई कोकण रेल्वे पोलीस अधीक्षकपदी

भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) शेखर प्रभुदेसाई यांची कोकण रेल्वे पोलीस अधीक्षकपदी बदली केली आहे. श्रुती अरोरा यांची राज्य पोलीस नियंत्रण कक्ष (एसपीसीआर) अधीक्षकपदी बदली केली. त्यांच्याकडे राज्य गुन्हा रिकाॅर्ड ब्युरो (एससीआरबी) अधीक्षक पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला. टिकम सिंग वर्मा यांच्याकडे पोलीस प्रशिक्षण स्कूलचे प्राचार्यपद देण्यात आले. याबाबतचा आदेश कार्मिक खात्याचे अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी जारी केला आहे. 

हेही वाचा