पणजी : केरी-सत्तरीच्या सरपंच सुप्रिया विष्णू गावस यांच्यावर नऊपैकी सात पंच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आला. यामुळे त्यांचे सरपंचपद धोक्यात आले आहे.
या अविश्वास ठरावावर नंदिता गावस, श्रीपाद गावस, उस्मान सय्यद, संदीप ताटे, भिवा गावस, दीक्षा गावस आणि तन्वीर पांगम या पंच सदस्यांच्या सह्या आहेत.
पंचायतीच्या हिताच्या विरोधात काम करणे आणि पंच सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. अविश्वास ठराव झाल्याने आता लवकरच त्यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल.