पणजी : प्रुडंट मिडियाचे कोकणी वर्तमानपत्र ‘भांगरभूंय’ आता दिल्लीत संसदेच्या वाचनालयात उपलब्ध झाले आहे. यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांनी पुढाकार घेतला. संसदेच्या वाचनालयात नियमितपणे भांगरभूंय उपलब्ध व्हावे, यासाठी ते कायम प्रयत्नशील असतील असे त्यांनी म्हटले.
भांगरभूंय हे गोव्यातून प्रकाशित होणारे एकमेव कोकणी वर्तमानपत्र आहे. कोकणी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत, असे खासदार फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, कोकणीला दोन ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत. कलाकार, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योगदान या भाषेच्या उन्नतीसाठी मोलाचे आहे. त्यामुळे साहित्य, रंगभूमी आणि इतर क्षेत्रांतील कामगिरीमुळे कोकणी भाषेला अधिक बळकटी मिळेल. कोकणी ही संवाद आणि ज्ञान वाढीसाठी अत्यावश्यक असून, तिच्या प्रगतीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासनही खासदार फर्नांडिस यांनी दिले.