बंगळुरू : गोव्यातल्या बिट्स पिलानीत विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी ताजी असतानाच बेळगावमधील बिम्स संस्थेची २७ वर्षीय विद्यार्थिनीही आपल्या खोलीच मृत आढळल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
देशात विद्यार्थ्यांच्या मृत्यूंमुळे शैक्षणिक क्षेत्रात सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.
ती नैराश्याने ग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. मूळची बंगळुरूची असलेल्या प्रिया नावाच्या या विद्यार्थिनीचा मृतदेह बिम्स हॉस्पिटल कॅम्पसमधील हॉस्टेलमध्ये तिच्या बेडवर आढळला. तिच्या हॉस्टेलमधील मैत्रिणींनी तिला तातडीने आपत्कालीन आणि ट्रॉमा सेंटरमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.