पणजी : गोव्यात प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांपैकी तब्बल ३९ टक्के खाती विनावापर असल्याचे समोर आले आहे. देशभरात तब्बल ५६.०३ कोटी खाती निष्क्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. राज्यात या योजनेअंतर्गत २ लाख २० हजार २५२ खाती उघडण्यात आली होती, त्यापैकी ८५ हजार ९९३ खाती सध्या विनावापर आहेत.
या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांत सर्वाधिक खाती निष्क्रिय आहेत. गरीब व सर्वसामान्य नागरिकांना अधिकृत बँकिंग व्यवस्थेत आणण्यासाठी २०१४ मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली होती. मोफत बचत खाते, रुपे कार्ड, अपघात विमा यांसारख्या सुविधा देऊन आर्थिक समावेशन साध्य करण्याचा उद्देश होता.
परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर खाती वापरात नसल्याने योजनेची परिणामकारकता आणि लोकांचा प्रत्यक्ष लाभ कितपत झाला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.