गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने

'गोवा राज्य चित्रपट महोत्सवा' केवळ चित्रपटांचे प्रदर्शनच नाही, तर युवा पिढीसाठी कार्यशाळा आणि स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे गोव्यातील चित्रपट संस्कृतीला बळकटी मिळेल.

Story: प्रासंगिक |
18 hours ago

आपल्या गोव्याला कला आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा जगापुढे यावी, त्याचबरोबर तिचा विकास आणि संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी सरकारने खास उपाययोजना केलेली आहे. कला संस्कृती आणि त्याचबरोबर सरकारने मनोरंजनाचे धोरण देखील आखले आहे. सरकार मनोरंजन क्षेत्राचा विकास करण्यात अग्रेसर आहे. 

विद्यमान आठवडा हा आपल्या गोमंतकीयांसाठी परवणीचा ठरणार आहे, कारण आपला स्वातंत्र्यता दिवस साजरा होणार आहे आणि उद्यापासून सुरू होणारा गोवा राज्य चित्रपट महोत्सव, ज्याचे आयोजन सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे गोवा मनोरंजन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. हा द्वैवार्षिक चित्रपट महोत्सव, ज्यात फिचर आणि नॉन-फिचर गोव्यात निर्माण केलेले चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. आजपासून १७ ऑगस्टपर्यंत चार दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात दहा, अकरा, बारा आवृत्यांचा समावेश आहे. 

बहुप्रतिक्षित असलेल्या या महोत्सवासाठी जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९; जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१; जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राज्यातील प्रतिथयश चित्रपट निर्मात्यांकडून प्रवेशिका आणलेल्या आहेत. आपले गोमंतकीय निर्माते, कलाकार यांचा कलाविष्कार पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

त्याचबरोबर या चित्रपट महोत्सवातील आयोजनाच्या मांडणीमध्ये ४८ तासांत लघुपट निर्मिती स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेची संकल्पना 'शेजारी' ही आहे. स्पर्धकांना या संकल्पनेवर आधारित आपला लघुपट ४८ तासांत पूर्ण करून स्पर्धेत सादर करावा लागणार आहे. 

गोव्यात चित्रपट संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. खाते अनेक योजना राबवीत आहे आणि राज्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन, हा त्याचाच एक भाग आहे. सरकारतर्फे चित्रपट निर्मितीसाठी राबवण्यात येणारी मुख्य योजना 'गोवा चित्रपट आर्थिक सहाय्य योजना २०१६' ही योजना अंमलात आल्यापासून, गोव्यातील अनेक प्रतिभाशाली चित्रपट निर्मात्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यावर्षी जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. 

'गोवा चित्रपट आर्थिक सहाय्य योजना २०१६' ही योजना गोवा राज्य चित्रपट महोत्सव नियंत्रण १९९८ अंतर्गत राबविण्यात आलेली आहे. तेव्हापासून २०११ ते २०१४ पर्यंत यात सुधारणा, बदल हे स्थानिक गोममंतकीय चित्रपट निर्मात्यांचे हित लक्षात घेऊन करण्यात आले आहेत. तसेच गोव्यात चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी गोवा चित्रपट सहाय्य योजनेअंतर्गत देण्यात येणारी पुरस्कारांची रक्कम आणि प्रोत्साहन निधीत वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे. 

सांप्रत चित्रपट महोत्सवात मनोरंजनाबरोबरच आपल्या युवा वर्गाला यासंबंधी काहीतरी शिकता यावे, यासाठी मास्टरक्लासेस, कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. यात ख्यातनाम छायाचित्रकार नीलभ कौल व पेंटिंग विथ लाइव्ह, छायाचित्रण ज्याला चित्रपटाचा आत्मा म्हटले जाते, याचे आयोजन छायाचित्रणातील बारकावे समजण्यासाठी करण्यात येणार आहे. 

नट व मार्शल आर्टिस्ट आणि फिटनेस प्रशिक्षक चिता यज्ञेश शेट्टी हे 'अॅक्शन इन सिनेमा'अंतर्गत अॅक्शन सिनमधील रहस्य उलगडून दाखवणार आहेत. तसेच सिनेनट कवरजीत पेंटल हे सिनेमातील कला आणि हस्तकला याचे अभिनयातील महत्त्व समजावून सांगणार आहेत, तर चित्रपट निर्माते पंकज सक्सेना सहभागींना 'सिनेमाची ताकद समजून घेण्याचा प्रवास' सांगतील. 

सरकारची चित्रपट सहाय्य योजना ही राजभाषेत निर्माण करण्यात आलेल्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यास अमंलात आणलेली आहे. या चित्रपटाद्वारे गोव्यातील कला आणि संस्कृती, वारसा यांचे सृजनशील चित्रपट अभिव्यक्तीतून प्रदर्शन व्हावे, हा मुख्य हेतू आहे. 

या महोत्सवाचे सार जीएसएफएफ-ए कॅमेरा शटर सारांशित करते आणि राज्याच्या चित्रपट व सांस्कृतिक महत्त्वाच्या बैठकी आणि संगमाच्या रूपात महोत्सवाला वळवते


निखिल प्राजक्ते

(लेखक माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सहाय्यक  माहिती अधिकारी आहेत.)