पणजी : फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या हिंदू धर्मीय लोकांवर अनन्वित अत्याचार झाले. या हिंस्र अत्याचारात हिंदू लोकांना आपले कुटुंबीय गमावावे लागले. आजच्या पिढीने हे बलिदान लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गुरुवारी पणजीत विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित आयोजित केलेल्या
प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, १४ ऑगस्ट रोजी देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानाने मुस्लिम वगळता आणि धर्मियांना तो देश सोडण्यासाठी खूप त्रास दिला. यामध्ये शीख, ख्रिस्ती तसेच हिंदू धर्मीय लोकांचा समावेश होता. तिथे राहणारे अन्य धर्मीय चालत, रेल्वेने भारतात येत असताना त्यांच्यावर खुनी हल्ले झाले. या हिंसाचारात अनेक लोकांचा मृत्यू झाला. तत्कालीन हिंसाचाराच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आज भरवण्यात आले आहे. ही छायाचित्रे पाहून आजही अंगावर काटा येतो.
ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. त्याच सोबत त्यासोबत पाकिस्तानातून भारतात येताना आपल्या कुटुंबीयांचे बलिदान दिलेल्या लोकांची आठवण ठेवणे आवश्यक आहे. हे प्रदर्शन विशेष करून करून पिढीने पाहणे गरजेचे आहे. भारतात आल्यानंतर देखील अशा लोकांना नागरिकत्व मिळणे अवघड होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यात बदल करून या लोकांना नागरिकत्व दिले . यामुळेच त्यांना खरा न्याय मिळाला आहे.
छ.शिवाजी महाराज संग्रहालयाची पायाभरणी
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १० सप्टेंबर नंतर गोव्यात येणार आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, पर्वरी टाऊन स्क्वेअर या प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे.