पेडणे : हरमल किनारी भागात बेकायदेशीर वास्तव्य; एका रशियन नागरिकाला अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
पेडणे : हरमल किनारी भागात बेकायदेशीर वास्तव्य; एका रशियन नागरिकाला अटक

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी हरमल येथे व्हिसा व पासपोर्टशिवाय वास्तव्यास असलेल्या रशियन नागरिकाला  अटक केली. ‘ऑपरेशन फ्लशआऊट’ (Opration Flushout) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, गोव्यात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हे विशेष अभियान राबवले आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या पथकाने पेडणे तालुक्यातील हरमल येथे शोध मोहीम राबवली. यात गिरकरवाडा, हरमल येथील ख्रिसपेरिओ डिसोझा यांच्या ठिकाणी वास्तव्य करणारा इव्हगेनी शेलोपुखो (४०) हा रशियन नागरिक आढळून आला. त्याच्याकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणी गुन्हे शाखेने १९४८ च्या ‘फॉरेनर्स ऑर्डर’, १९५० च्या ‘पासपोर्ट एन्ट्री इंटु इंडिया रूल्स’ व १९२० च्या ‘पासपोर्ट एन्ट्री ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. काल सायंकाळी ५.४० वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आरोपीला अटक करण्यात आली. तसेच त्याच्या अटकेची माहिती  पणजीतील परराष्ट्र प्रादेशिक नोंदणी कार्यालयामार्फत रशियन दूतावासाला कळवण्यात आली.

हेही वाचा