जम्मू : येथील किश्तवाडमधील चशोटी परिसरात गुरुवारी ढगफुटीची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत १२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. ढगफुटी झाल्यानंतर परिसराला पूराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला.
श्रीनगर हवामान केंद्राने ट्वीटरवर केलेल्या पोस्ट नुसार पुढील ४-६ तासांत जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे. कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, श्रीनगर गंदरबल, बडगाम, पूंछ, राजौरी, रियासी, उधमपूर, डोडा, किश्तवारच्या डोंगराळ भागात, काझीगुंड-बनिहाल-रामबन या क्षेत्रात काही कालावधीसाठी मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय, काही संवेदनशील ठिकाणी व डोंगराळ भागात ढगफुटी, अचानक पूर, भूस्खलनाची शक्यता आहे.