मडगाव : मुंगूल गँगवॉर प्रकरणात आणखी पाच जणांना अटक

एकूण आठ संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th August, 05:20 pm
मडगाव : मुंगूल गँगवॉर प्रकरणात आणखी पाच जणांना अटक

मडगाव : मुंगूल-फातोर्डा येथील गँगवॉर प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी याआधी तिघांना अटक केली होती. ताज्या कारवाईत आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून, एकूण आठही संशयितांना मडगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

घटना मुंगूल माडेल येथे घडली होती. दोन गँगमधील पूर्ववैमनस्यातून मास्क घालून आलेल्या सुमारे १५ जणांनी गाडी अडवून रफीक ताशान (२४) व युवकेश सिंग बदैला (२०) यांच्यावर तलवार, कोयता, सोडा बॉटल्स अशा धारदार व घातक वस्तूंनी हल्ला केला. यात दोघांची तब्येत गंभीर झाली आहे. घटनेनंतर दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलिसांनी पाच संशयितांविरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती. काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर यातील विल्सन कार्व्हलो, शाहरुख (रा. दवर्ली) व रसूल (रा. मडगाव) यांना याआधी अटक झाली होती.

यानंतरच्या तपासात संशयित अक्षय तलवार, राहुल तलवार (रा. बोर्डा) यांच्यासह आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व आठ संशयितांना न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचा