'फॉरेक्स'मध्ये गुंतवणूकीवर ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एकाला तब्बल ४.६४ लाखांचा गंडा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th August, 04:33 pm
'फॉरेक्स'मध्ये गुंतवणूकीवर ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एकाला तब्बल ४.६४ लाखांचा गंडा

डिचोली : येथील ५८ वर्षीय व्यक्तीला फॉरेक्स ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४ लाख ६८ हजार ७७५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार मिलिंद गोरे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतः फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून फोनद्वारे संपर्क साधला. गुंतवणुकीवर मोठा नफा मिळेल असे सांगून त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. आरोपीने वेगवेगळ्या वेळेस गुगल पे खात्यात एकूण ४,६८,७७५ रुपये जमा करण्यास भाग पाडले. मात्र, नफा न देता आरोपीने संपर्क तोडला. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३१९(१) आणि ३१८(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचा