अन्य भाज्यांचे दर उतरले
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आवक कमी असल्याने सोमवारी पणजी बाजारात नारळाचे दर आकारानुसार ४० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सणाच्या कालावधीत नारळाचे दर वाढल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. टोमॅटोचे भाव १० रुपयांनी वाढून ६० रुपये किलो झाले. गत आठवड्याच्या तुलनेत अन्य भाज्यांच्या दरात घट झाली. वालपापडीचे दर ४० रुपयांनी कमी होऊन ८० रुपये किलो झाले. ढब्बू मिरचीचे दर ४० रुपयांनी, तर मिरचीचे दर २० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे ८० आणि १०० रुपये झाले.
बाजारात शेवग्याचे दर २० रुपयांनी कमी होऊन १२० रुपये झाले. दोडका, गवार कारले २० रुपयांनी कमी होऊन प्रत्येकी ६० रुपये किलो झाले. फ्लॉवर आणि कोबी १० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे ४० आणि ३० रुपये झाले. भेंडी आणि वांगी २० रुपयांनी कमी होऊन ६० रुपये किलो झाले. कांदा, बटाट्याचे दर प्रत्येकी ४० रुपये किलो होते. मेथी २५ रुपये, तर शेपू २० रुपये जुडी होती. पालक १० रुपये तर तांबडी भाजीची एक जुडी १५ रुपयांना होती.
बाजारात गाजर आणि बीट प्रत्येकी ८० रुपये किलो होते. कोथिंबीर २० रुपये जुडी तर लिंबू १० रुपयांना ३ होते. आले २०० रुपये, लसूण दर्जानुसार ३०० ते ४०० रुपये किलो होता. सोमवारी फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यांवर भेंडी ४२ रुपये, कोबी २० रुपये, फ्लॉवर ३२ रुपयांना एक नग, गाजर ४८ रुपये, वालपापडी ४८ रुपये, मिरची ६० रुपये, कांदा २७ रुपये, बटाटा २९ रुपये, तर टोमॅटो ५२ रुपये किलो होता.
...
चौकट
चिबुड १५० ते २५० रुपये नग
बाजारात चिबुड दाखल झाले असून त्यांची किंमत आकारानुसार १५० ते २५० रुपये आहे. नीरफणस १५० ते ३०० रुपयांला विकले जात होते. मोठी भेंडी १०० रुपयांना ७ नग होती.