१,०५७ पोलिसांचे तीन वर्षांहून जास्त काळ एकाच ठिकाणी ठाण!
पोलीस महासंचालकांच्या आदेशाचा परिणाम शून्य : बदलीचे आदेश देऊनही अनेक कर्मचारी मूळ जागेवरच
Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th August, 11:08 pm

👮
⚠️ गोवा पोलीस खात्यात 1,057 कर्मचाऱ्यांना बदली नाही
•
पणजी : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करण्याचा नियम असताना, गोवा पोलीस खात्यात 1,057 कर्मचारी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी काम करत असल्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. यात उपनिरीक्षकापासून ते कॉन्स्टेबलपर्यंतचे अधिकारी समाविष्ट आहेत.
10+ वर्षे एकाच ठिकाणी
107
📊 विभागानुसार बदली न झालेले कर्मचारी
पोलीस स्थानके
415 कर्मचारी
सुरक्षा विभाग
135 कर्मचारी
वाहतूक विभाग
118 कर्मचारी
किनारी पोलीस स्थानके
35 कर्मचारी
👥 पदानुसार वितरण
9 उपअधीक्षक
3+ वर्षे एकाच ठिकाणी
57 उपनिरीक्षक
6 महिला उपनिरीक्षक
115 सहायक उपनिरीक्षक
26 महिला सहायक
298 हवालदार
20 महिला हवालदार
445 कॉन्स्टेबल
78 महिला कॉन्स्टेबल
📅 वर्षानुसार बदली न झालेले कर्मचारी
वर्ष | कर्मचारी संख्या |
२००० | १ |
२००५ | ५ |
२०१०-२०१५ | २० |
२०१६-२०२० | २४८ |
२०२१-२०२२ | ६९६ |
एकूण | १,०५७ |
⚖️ पोलीस कृती
•
२०२४ मध्ये 1,384 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या
•
नवीन जागी रुजू झाल्याशिवाय पगार रोखण्याचा आदेश
•
पोलीस महासंचालक आणि अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्या आदेशानुसार