आग लागल्यामुळे दोन दुकाने जळून खाक
पणजी : येथील नॅशनल थिएटरसमोर असलेल्या दोन दुकानांना शुक्रवारी दुपारी आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत गोपाळ साळकर यांच्या मालकीचे लॉन्ड्रीचे दुकान आणि नाझिर दाऊद आघा यांच्या मालकीचे सायकल विक्रीचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले.
आग लागल्याचे समजताच परिसरात प्रचंड धुराचे लोट पाहायला मिळाले. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
(बातमी अपडेट होत आहे)