आजपासून ओटीटीवर ‘हाऊसफुल’ मनोरंजन

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st August, 12:22 am
आजपासून ओटीटीवर ‘हाऊसफुल’ मनोरंजन


१ ऑगस्ट हा शुक्रवार ओटीटी प्रेमींसाठी पर्वणीसारखा आहे. अ‍ॅक्शन, कॉमेडी, रोमांस आणि स्पोर्ट्स ड्रामा अशा सर्व रसिकांसाठी काही ना काही खास आहे. नेटफ्लिक्स, प्राइम, झी ५, यूट्यूब, सोनीलिव्ह आणि अ‍ॅपल टीव्ही+ वर हे सर्व नवकोरे कंटेंट बघायला ​मिळणार आहेत.


चीफ ऑफ वॉर । अ‍ॅपल टीव्ही+
जेसन मोमोआ, लुसियान बुकानन, टेमुएरा मॉरिसन यांच्या अभिनयाने नटलेला १९व्या शतकात घडणारा हा ऐतिहासिक ड्रामा काइआना नावाच्या योद्ध्याची कथा आहे. परदेशातून परतलेला काइआना आपल्या भूमीला अंतर्गत संघर्षांनी पोखरलेले पाहतो. यानंतर तो आपल्या भूमीला वाचवण्यासाठी संघर्ष करतो. ९ भागांची ही मालिका सत्य घटनांवर आधारित आहे.


सितारे ज़मीन पर । युट्यूब
आमिर खान, जेनेलिया देशमुख यांचा सितारे जमीन पर चित्रपट एका चिडचिड्या बास्केटबॉल प्रशिक्षकाची (गुलशन अरोरा) कथा आहे. ज्याला मद्यधुंद अवस्थेत केलेल्या चुकांमुळे विकलांग खेळाडूंच्या संघाचे प्रशिक्षण घेण्यास भाग पाडले जाते. हा स्पोर्ट्स-ड्रामा मूव्ही स्पॅनिश चित्रपट चॅम्पियन्स (२०१८) चा अधिकृत रिमेक आहे. दर्शकांसाठी १०० रु. मध्ये पे-पर-व्यू प्रीमियर युट्युबवर पाहता येणार आहे.


बकैती । झी ५
राजेश तैलंग, शीबा चड्ढा, तान्या शर्मा अभिनित बकैती गाझियाबादमधील एका कुटुंबाची कथा आहे. जे आर्थिक अडचणींमुळे घरातील एक खोली भाड्याने देण्याचा निर्णय घेतात. पण त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात अधिक गोंधळ निर्माण होतो.


माय ऑक्सफर्ड इयर । नेटफ्लिक्स
सोफिया कार्सन, कोरी माइलक्रिस्ट, डग्रे स्कॉट अभिनित हा चित्रपट जूलिया व्हेलन यांच्या कादंबरीवर आधारित आहे. ही प्रेमकथा एका महत्त्वाकांक्षी अमेरिकी विद्यार्थिनीची (अ‍ॅना) आहे, जी इंग्लंडच्या ऑक्सफर्डमध्ये अभ्यासासाठी जाते आणि तिथे तिची भेट एका ब्रिटिश युवकाशी होते. त्यांच्या नात्यामुळे तिचे आयुष्य वेगळे वळण घेते.


ट्विस्टेड मेटल: सीझन २ । सोनीलिव्ह
अँथनी मॅकी, स्टेफनी बीट्रिज अभिनित ही एक पोस्ट-अपोकॅलिप्टिक अ‍ॅक्शन-कॉमेडी वेबसीरिज आहे. जिथे जॉन आणि क्वायट एका घातक टूर्नामेंटमध्ये भाग घेतात आणि विविध शत्रूंशी दोन हात करतात. रोमांचक थरार आणि विनोद यांचा मिलाफ या सीरिजमध्ये पहायला मिळतो.


सुपर सारा । जीओ हॉटस्टार
ही एक स्पेनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्टार सारा मोंटिएल उर्फ मारिया अँटोनीया अबाद फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित बायोग्राफिकल वेबसीरिज आहे. तिच्या संघर्षमय आणि यशस्वी प्रवासाची गोष्ट सांगण्यात आली आहे.


हाऊसफुल ५ । अॅमेझॉन प्राईम
अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस अभिनित हा चित्रपट दोन क्लायमॅक्ससह ओटीटीवर येत आहे. एक सनकी उद्योगपती आपल्या मृत्यूनंतर प्रचंड संपत्ती मागे ठेवतो. त्याचा वारसदार कोण, हे सिद्ध करण्यासाठी तीन व्यक्ती ‘जॉली’ असल्याचा दावा करतात. दोन वेगवेगळ्या भागांमध्ये हाउसफुल ५ ए आणि हाउसफुल ५ बी वेगवेगळ्या क्लायमॅक्ससह हा कॉमेडी ड्रामा प्रदर्शित होणार आहे.