गणेशोत्सवात चित्रपट, वेबसिरीजची मेजवानी


28th August, 11:51 pm
गणेशोत्सवात चित्रपट, वेबसिरीजची मेजवानी

गणेशोत्सवाच्या या आठवड्यात मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. थिएटरमध्ये नवे चित्रपट प्रदर्शित होणारच, पण घरबसल्या ओटीटीवरही भन्नाट चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला मिळणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. तर दुसरीकडे सबा आझाद आणि इतर कलाकारांचे नवे प्रोजेक्ट्स थेट ओटीटीवर उपलब्ध होणार आहेत.


मेट्रो इन दिनों । नेटफ्लिक्स
सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, नीना गुप्ता, अली फजल, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि फातिमा सना शेख यांचा ‘मेट्रो… इन दिनों’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, पण यातील गाण्यांचे खूप कौतुक झाले होते.


साँग्स ऑफ पॅराडाईज । प्राइम व्हिडीओ
‘साँग्स ऑफ पॅराडाईज’ हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद महान काश्मिरी गायिका राज बेगमच्या भूमिकेत आहे. आलिया भट्टची आई सोनी राजदान देखील या चित्रपटात आहे.


माय लाईफ विथ द वॉल्टर बॉईज: सीझन २ । नेटफ्लिक्स
‘माय लाईफ विथ द वॉल्टर बॉईज’चा दुसरा सीझन आला आहे. दहा भागांचा हा सीझन एक टीनएज ड्रामा आहे. तुम्ही दुसरा सीझन २८ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.


द थर्सडे मर्डर क्लब । नेटफ्लिक्स
‘द थर्सडे मर्डर क्लब’ हा चार जणांवर बेतलेला चित्रपट आहे. हे चार जण बरीच वर्षे काल्पनिक खुनांबद्दल विचार करतात व त्या खुनांचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतात. पण असे करता करता ते स्वतःच एका खऱ्या खून प्रकरणात अडकतात, त्यानंतर काय घडते ते या चित्रपटात पाहता येईल. २८ ऑगस्टपासून ‘द थर्सडे मर्डर क्लब’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.


कराटे किड- लीजेंड्स । नेटफ्लिक्स
‘कराटे किड- लीजेंड्स’ ३० ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज झाला तेव्हा याला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता तो ओटीटीवर रिलीज होणार आहे.


अॅटोमिक । जिओहॉटस्टार
विल्यम लॅंगविस यांच्या ‘अॅटोमिक बाजार’ या नॉन-फिक्शन पुस्तकावर आधारित ही अॅक्शन-अॅडव्हेंचर मालिका आहे. यात दोन सामान्य नागरिक मॅक्स आणि जे.जे. यांची कथा दाखवली आहे. ते उत्तर आफ्रिकेत एका निर्दयी कार्टेलचे युरेनियम, तस्करी करून नेण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रवासात कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि धोकादायक तस्करांच्या जाळ्यात अडकून संघर्षात गुरफटतात.


लव्ह अनटँगल्ड । नेटफ्लिक्स
ही कोरियन ड्रामा सिरीज आहे ज्यात गॉन्ग म्युंग, शिन युन सू, चा वू मिन, युन संग ह्येओन आणि कांग मी ना हे कलाकार आहेत. कथा आहे पार्क से री या १९ वर्षांच्या मुलीची. ती आपल्या शाळेतील सर्वात लोकप्रिय मुलाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करते. पण तिची योजना अचानक बिघडते, कारण शाळेत एक नवीन मुलगा येतो आणि तिच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येते.