७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर: ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
नवी दिल्ली : शुक्रवारी दिल्लीमध्ये ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये बॉलिवूडपासून प्रादेशिक चित्रपटसृष्टीपर्यंत अनेक मान्यताप्राप्त चित्रपटांना गौरवण्यात आले. सर्वात मोठा सन्मान मिळाला तो शाहरुख खानला, ज्याला ‘जवान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच श्रेणीत विक्रांत मेस्सीला देखील ‘ट्वेल्थ फेल’ चित्रपटासाठी समान सन्मान देण्यात आला आहे.
मुख्य पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान (जवान), विक्रांत मेस्सी (ट्वेल्थ फेल) – संयुक्त पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : कथल
सर्वोत्कृष्ट संवादलेखक : दीपक किंगराणी (सिर्फ एक बंदा काफी है)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : द केरला स्टोरी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : पीव्हीएनएस रोहित – तेलुगू (बेबी)
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका : शिल्पा राव – चलेया (जवान)
सर्वोत्कृष्ट पटकथा : बेबी (तेलुगू), पार्किंग (तमिळ)
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : श्यामची आई
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार : भार्गव जगताप (नाळ-२)
(इतर विजेते: सुकीर्थी वेणी - गांधी कथा चेतू, कबीर खंदारे - जिप्सी, त्रिशा तोसर, श्रीनिवास पोकळे)
नॉन-फिचर फिल्म (लघुपट/ माहितीपट) श्रेणीतील महत्त्वाचे पुरस्कार:
सर्वोत्तम नॉन फिचर फिल्म : द फ्लॉवरिंग मॅन (हिंदी)
सर्वोत्तम लघुपट : गिद्ध: द स्कॅव्हेंजर (हिंदी)
सर्वोत्तम माहितीपट : गॉड, व्हल्चर अँड ह्युमन (इंग्रजी)
सर्वोत्तम दिग्दर्शक – नॉन फिचर : पियुष ठाकूर (द फर्स्ट फिल्म, हिंदी)
सर्वोत्तम संगीत – नॉन फिचर : द फर्स्ट फिल्म
सर्वोत्तम संपादन : मूव्हिंग फोकस
सर्वोत्तम ध्वनीरचना : धुंधगिरी के फूल
सर्वोत्तम छायांकन : लिटिल विंग्स (तमिळ)
सामाजिक भान असलेल्या चित्रपटासाठी पुरस्कार : द सायलेंट एपिडेमिक
कला/संस्कृती क्षेत्रातील चित्रपटासाठी पुरस्कार : टाईमलेस तमिळनाडू