‘माँ’ ते ‘मारीसन’ ओटीटीवर धमाकेदार चित्रपट, वेबसिरीज


21st August, 11:39 pm
‘माँ’ ते ‘मारीसन’ ओटीटीवर धमाकेदार चित्रपट, वेबसिरीज

या शुक्रवारी प्रेक्षकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवानी सजली आहे. कॉमेडी-ड्रामा, रोमँटिक कथा, पीरियड ड्रामा, सायन्स-फिक्शन थ्रिलरपासून ते भावनिक बंगाली सिनेमापर्यंत एकूण ७ नवे चित्रपट व शो प्रदर्शित होणार आहेत.


थलाइवन थलाइवी । अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ
विजय सेतुपती आणि नित्या मेनन अभिनीत हा तमिळ रोमँटिक कॉमेडी-ड्रामा दोन हट्टी प्रेमिकांच्या नात्याभोवती फिरतो. संघर्ष आणि आवेगांनी भरलेले त्यांचे नाते एका धक्कादायक वळणावर येते.


पीसमेकर सीझन २ । जिओहॉटस्टार
जॉन सीना परत येतोय त्याच्या सुपरहिरो अवतारात! मल्टिव्हर्सच्या प्रवासात तो आपल्या शत्रूंशी भिडणार आहे. जेम्स गनच्या सुपरमॅन घटनांनंतरचा हा पुढचा अध्याय प्रेक्षकांना अॅक्शन, मजा आणि थ्रिल देणार आहे.


ऐमा । नेटफ्लिक्स

१९८० च्या दशकातील कोरियन पीरियड ड्रामा. एका लोकप्रिय अभिनेत्री आणि एका उगवत्या तारकेतील नात्याभोवती फिरणारी ही कथा पुरुषप्रधान फिल्म इंडस्ट्रीतील त्यांचा संघर्ष दाखवते. ली हानी, बॅंग ह्यो-रिन आणि जिन सन-क्यू मुख्य भूमिकेत आहेत.


मारीसन । नेटफ्लिक्स
फहाद फाझिलचा स्लाइस-ऑफ-लाईफ कॉमेडी-ड्रामा. एक चोर धाया आणि अल्झायमरग्रस्त वेलायुधम (वादिवेलु) यांच्या जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाची भावस्पर्शी कहाणी आपल्याला पहायला मिळणार आहे.


इन्वेजन सीझन ३ । अॅपल टीव्ही+
एलियन आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा साय-फाय ड्रामा. पृथ्वी वाचवण्यासाठी नायकांची धडपड, एलियन मदरशिपमध्ये घुसखोरी आणि जगण्यासाठीची झुंज — यावेळी आणखी रोमहर्षक.


आमार बॉस । झी५
हा चित्रपट आई आणि मुलाच्या नात्या भोवती फिरतो. अनिमेश गोस्वामीच्या आयुष्यातील गोंधळ तेव्हा वाढतो, जेव्हा त्याची आई त्याच्या कंपनीत पार्ट-टाईम नोकरीला रुजू होते. या सिनेमातून दिग्गज अभिनेत्री राखी गुलजार टॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहेत.


माँ । नेटफ्लिक्स
ही कथा एका महिलेची आहे, जिच्या पतीचा मृत्यू भयानक झालेला असतो आणि आता तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या मुलीला वाचवण्यात दाखवले आहे. ती तिच्या गावी परतते; पण इथे तिला एका शापाचा सामना करावा लागतो. काजोल स्टारर हा चित्रपट २२ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.