गोव्याच्या चंदीगडविरुद्ध ३ बाद २९१ धावा

रणजी करंडक २०२५-२६ : अभिनव तेजराणाचे नाबाद शतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्याच्या चंदीगडविरुद्ध ३ बाद २९१ धावा

पणजी : पर्वरी येथील गोवा क्रिकेट असोसिएशन अकादमीच्या मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या एलिट ग्रुप ‘ब’मधील सामन्यात गोव्याने चंदीगडविरुद्ध पहिला डावात ३ बाद २९१ धावा केल्या आहेत. अभिनव तेजराणाने नाबाद शतक झळकावले. तर ललीत यादव ८० धावांवर खेळत आहे.
रणजी ट्रॉफी २०२५-२६ चा हंगाम बुधवारपासून सुरू झाला. गोव्याने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मंथन खुटकर आणि सुयश प्रभूदेसाई यांनी संयमी सुरुवात केली. मात्र मंथन २१ व सुयश ४७ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या अभिनव तेजराणाने दमदार फलंदाजी करत शतक झळकावले. कश्यप बखले शुन्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या ललित यादवने तेजराणाला चांगली साथ देत नाबाद ८० धावा केल्या. चंदीगडकडून विशु कश्यपने शानदार गोलंदाजी करत ८६ धावांत ३ बळी घेतले.
गोवा संघाने पहिल्या डावात ३ गडी गमावून २९१ धावा केल्या आहेत. तेजराणा १३० तर ललीत यादव ८० धावांवर नाबाद आहेत.