‘वॉर २’ ते ‘मिराई’ ओटीटीवर अॅक्शनचा ‘डबल डोस’

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
10th October, 12:46 am
‘वॉर २’ ते ‘मिराई’ ओटीटीवर अॅक्शनचा ‘डबल डोस’


शुक्रवारी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, जिओहॉटस्टार आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात एकापेक्षा एक भन्नाट चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांसाठी सज्ज आहेत. तेलुगू भाषेतील ‘मिराई’ आणि ऋतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर यांचा ‘वॉर २’ दोन्ही ब्लॉकब्लस्टर चित्रपट दाखल होत आहेत.

 

वॉर २ । नेटफ्लिक्स

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ मध्ये हृतिक रोशन, कियारा अडवाणी आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत, हा वायआरएफ स्पाय यूनिवर्सचा भाग असलेला ब्लॉकबस्टर चित्रपट १४ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

 

मिराई । जिओ हॉटस्टार

तेलुगू भाषेतील हा फॅन्टसी अॅक्शन थ्रिलर तेजा सज्जा अभिनित आहे. यात एका अनाथ मुलाची कथा आहे, जो आपल्या आयुष्यातील सत्य जाणून घेतो. त्याला नऊ पवित्र ग्रंथ एका उदयोन्मुख अंधकारमय शक्तीपासून वाचवायचे आहेत. या ग्रंथांच्या शक्तीने जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुष्ट शक्तीशी त्याची झुंज रंगते.

 

सर्च : नैना हत्याकांड । जिओ हॉटस्टार

ही क्राइम थ्रिलर मालिका एसीपी संयुक्‍ता दास या अनुभवी महिला पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. एका राजकारण्याच्या कारमधून एका मुलीचा मृतदेह सापडल्यावर हे खून प्रकरण तिच्याकडे सोपवले जाते. या मालिकेत कोंकणा सेनशर्मा मुख्य भूमिकेत असून ही मालिका डॅनिश क्राइम ड्रामा ‘द किलिंग’वर आधारित आहे.

 

ओल्ड मनी । नेटफ्लिक्स

हा रोमँटिक ड्रामा आहे. ज्यात स्वतःच्या प्रयत्नांवर उभा राहिलेला उद्योगपती उस्मान आणि ‘ओल्ड मनी’ डिप्लोमॅट निहाल यांच्या प्रेमकथेतील सत्तासंघर्ष दाखवला आहे. इस्तंबूलच्या पार्श्वभूमीवर आधारित या मालिकेत अस्ली एन्भर, एंगिन आक्यूरेक आणि सेरकान आल्टुनोराक प्रमुख भूमिकेत आहेत.

 

द लास्ट फ्रंटियर । अॅपल टीव्ही+

अलास्काच्या बर्फाळ जंगलात तुरुंगातील कैद्यांना घेऊन जाणारे विमान कोसळते. यूएस मार्शल फ्रँक रेमनिक हा एकटाच या परिस्थितीला सामोरा जातो. सुटलेल्या कैद्यांना पकडत असताना तो आपले गावही सुरक्षित ठेवू शकेल का, हा या थ्रिलरचा मुख्य प्रश्न आहे.

द वूमन इन केबिन १० । नेटफ्लिक्स
रुथ वेअर यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित हा सायकोलॉजिकल थ्रिलर लॉरा ब्लॅकलॉक या प्रवास पत्रकारिणीची कथा सांगतो. लक्झरी क्रूझवर प्रवास करताना ती एका प्रवाशाला जहाजावरून फेकताना पाहते, असे ती सांगते. पण जहाजावर सगळे प्रवासी उपस्थित असतात. मग सत्य काय आहे? तिचे मानसिक संतुलन ढळलेय, की खरोखरच काहीतरी भयंकर घडले आहे, हे सिरीज पाहिल्यावर लक्षात येईल.

 

कुरुक्षेत्र : द ग्रेट वॉर ऑफ महाभारत । नेटफ्लिक्स

महाभारताच्या महान युद्धावर आधारित ही अ‍ॅनिमेटेड मालिका १८ दिवसांच्या कुरुक्षेत्र युद्धातील नाट्यमय घडामोडी दाखवते. ही मालिका पांडव-कौरवांच्या संघर्षातून नीतिमूल्ये, वैयक्तिक वैर आणि युद्धातील भावनिक गुंतागुंत यांचा अनोखा पट उलगडते.

 

जॉन कँडी: आय लाईक मी । अमेझॉन प्राइम व्हिडिओ

कॅनेडियन अभिनेता जॉन कँडी यांच्या आयुष्यावर आधारित हा डॉक्युमेंटरी चित्रपट आहे. त्यांच्या कारकिर्दीतील यश-अपयश, वैयक्तिक संघर्ष आणि पडद्यामागील आयुष्याचे वास्तव यात पाहायला मिळते. यात कधीही न पाहिलेले फुटेज आणि खास मुलाखती दाखवण्यात आल्या आहेत.