‘महाराणी ४’ ते ‘बारामुला’ मनोरंजनाचा मेगा आठवडा


06th November, 11:43 pm
‘महाराणी ४’ ते ‘बारामुला’ मनोरंजनाचा मेगा आठवडा

या शुक्रवारी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या नवीन चित्रपट आणि मालिकांची भन्नाट मेजवानी आहे. या आठवड्यात नवनवीन कथा, थरार अनुभवायला मिळणार आहे.

 

महाराणी : सीझन ४ । अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ

हुमा कुरेशी अभिनीत ही लोकप्रिय मालिका आता राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करते. राणी भारती स्थानिक सत्तेवर प्रभुत्व गाजवल्यानंतर दिल्लीच्या राजकीय रणांगणात उतरते. सत्तेच्या खेळात ती किती टिकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

थोडे दूर थोडे पास । झी ५

पंकज कपूर, मोना सिंग, कुणाल रॉय कपूर आणि आयेशा कडूसकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा भावनिक कौटुंबिक चित्रपट आहे. रिटायर्ड नेव्हल ऑफिसर आपल्या कुटुंबाला सहा महिन्यांच्या डिजिटल डिटॉक्स चॅलेंजसाठी एक कोटीचे बक्षीस ठेवतो. पण या आव्हानातून प्रत्येकाचे आयुष्य बदलते.

 

बारामुला । नेटफ्लिक्स

कश्मीरमधील शांत बारामुला शहरात घडणारी ही कथा एका नव्याने बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. दिसायला परिपूर्ण आयुष्य असलेला हा अधिकारी एका गुंतागुंतीच्या प्रकरणाची चौकशी करताना अलौकिक शक्तींशी सामना करतो आणि धक्कादायक रहस्ये उलगडतात. मनव कौल आणि भाषा सुम्बली यांच्या दमदार भूमिका या मालिकेचे आकर्षण आहे.

 
फ्रँकेन्स्टाईन । नेटफ्लिक्स
गिलर्मो डेल टोरो यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा क्लासिक कथानकाचा आधुनिक आविष्कार आहे. वैज्ञानिक व्हिक्टर फ्रँकनस्टाईन आपल्या प्रयोगातून राक्षसी प्राण्याला जन्म देतो आणि त्यानंतर सुरू होते निर्माता व निर्मितीची विनाशकारी गाथा. कलाकारांमध्ये ऑस्कर आयझॅक, जेकब एलॉर्डी, मिया गोथ आणि क्रिस्टोफ वॉल्ट्झ यांचा समावेश आहे.                                                                                                   
 मॅक्सटन हॉल : सीझन २ । अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ                                         जर्मन रोमँटिक मालिकेचा हा दुसरा सीझन ‘सेव्ह यू’ या कादंबरीवर आधारित आहे. रुबी बेल आणि जेम्स ब्यूफोर्ट यांच्या नात्यातील गुंतागुंत, कुटुंबातील शोकांतिकेनंतर उभे राहणारे भावनिक संघर्ष, हे सर्व नव्या भागांत दिसणार आहे. यामध्ये हॅरिएट हर्बिग-मैटन आणि डॅमियन हार्डुंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.                                                                             
प्लुरिबस । अ‍ॅपल टीव्ही+
ब्रेकिंग बॅड आणि बेटर कॉल शॉलनंतर व्हिन्स गिलिगन यांचा हा नवा प्रकल्प. न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्की येथे एका रहस्यमय विषाणूमुळे संपूर्ण जग ‘अत्यंत आनंदी’ बनते, मात्र एकटी कॅरोल स्टुर्का हिच्यावर परिणाम होत नाही. या विचित्र जगात तीच का वेगळी आहे, हे शोधणे म्हणजे मालिकेचे मुख्य रहस्य आहे.                                                                     
अॅज यू स्टड बाय । नेटफ्लिक्स
दोन महिला, यून सू आणि ही सू, एका व्यक्तीचा खून करण्याचे षङयंत्र रचतात, पण अचानक आलेला पाहुणा सगळे उलथून टाकतो. ही मालिका ह्युदो ओकूदा यांच्या नाओमी आणि कानाको या जपानी कादंबरीवर आधारित आहे. कलाकारांमध्ये जॉन सो नी, ली यू मी, जांग सुंग जो आणि ली मू सॅंग आहेत.                                                           
ऑल हर फॉल्ट । जीओ हॉटस्टार
आंद्रेआ मारा यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ही कथा एका आईची आहे, जी आपल्या मुलाला पहिल्याच प्लेडेटवर घेण्यासाठी जाते, पण दिलेला पत्ता खोटा निघतो आणि मुलगा गायब होताे. पुढे सुरू होतो तिच्या आयुष्यातील धक्कादायक संघर्ष.                                
मँगो । नेटफ्लिक्स
एक महत्त्वाकांक्षी हॉटेल व्यवसायिक महिला सुट्टीसाठी आपल्या मुलीसह एका रम्य मँगो ऑर्चर्डमध्ये येते, जिथे तिची ओळख त्या शेताच्या मालकाशी होते. भावनांनी आणि निसर्गाने भरलेली ही कोमल कथा नात्यांच्या नवीन छटा दाखवते.                                               
घ्रुम अँट टू ब्राईड । नेटफ्लिक्स
ही हलकी-फुलकी प्रेमकहाणी आहे ॲडम नावाच्या व्यक्तीची, जो कमिटमेंटपासून घाबरतो, पण एकाचवेळी दोन स्त्रियांशी गुपचूप साखरपुडा झाल्याने गोंधळात सापडतो. पुढे उलगडते हास्य, गैरसमज आणि प्रेमाची गंमत.