वेर्णा खून प्रकरणातील संशयितांविरोधात वॉरंट जारी

संशयितांनी जामिनावेळी न्यायालयात जमा केलेले वैयक्तिक बाँड जप्तीचे आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th November, 11:46 pm
वेर्णा खून प्रकरणातील संशयितांविरोधात वॉरंट जारी

मडगाव : वेर्णा येथील प्रभू महातो खून प्रकरणातील तिन्ही संशयितांविरोधात दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने २५ हजारांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याशिवाय त्यांच्या वैयक्तिक बाँड जप्त करण्याचे व जामिनदारांना नोटीस जारी करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे.
वेर्णा पोलिसांकडून प्रभू महातो याच्या ७ जुलै २०२२ रोजी झालेल्या खून प्रकरणात तीन संशयितांविरोधात खून करणे, पुरावे नष्ट करणे याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आले होते. यात संशयित सतेंद्र महातो, गुलाब महातो व रूपेश महातो यांना अटक करण्यात आले होते. बुधवारी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी तिन्ही संशयितांनी हजर राहण्यासाठी केलेले अर्ज व सुनावणी पुढे ढकलण्यासाठी फेटाळून लावली.
संशयितांनी जामिनावेळी न्यायालयात जमा केलेले वैयक्तिक बाँड जप्त करण्याचे आदेश दिले. संशयितांविरोधात २५ हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले असून त्यांच्या जामिनदारांना नोटीस जारी करण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार असून संशयितांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.