कोलवाळ कारागृहाचे उपअधीक्षक गावकर यांची तडकाफडकी बदली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
कोलवाळ कारागृहाचे उपअधीक्षक गावकर यांची तडकाफडकी बदली

म्हापसा :कोलवाळ कारागृहाचे उपअधीक्षक (जेलर) अनिल गावकर यांची तडकाफडकी बदली तुरूंग महानिरीक्षक कार्यालयात करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश तुरूंग महानिरीक्षक केशव राम चौरासिया यांनी जारी केला आहे.

मनमानी कारभार व कार्यालयीन कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गावकर यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

उपअधीक्षक गावकर यांनी कारागृह कारभारातील सुमारे १९ विभागांचे प्रमुख म्हणून पदभार स्वतःकडे ठेवला होता. त्यांच्या या एकंदरीत मनमानी कारभारामुळे त्यांना तुरूंग प्रशासनाने चारवेळा कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सदर नोटीसांचे उत्तर हे समानधारक नसल्याने ही बदलीची कारवाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा