मी नावे दिलेल्या दोन राजकारण्यांची चौकशी करा : रामा काणकोणकर

जातीचे प्रमाणपत्र पूर्वीच तपासल्याचा दावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
मी नावे दिलेल्या दोन राजकारण्यांची चौकशी करा : रामा काणकोणकर

पणजी : मी पोलिसांना दोन राजकारण्यांची नावे दिल्यानंतरही त्यांची कोणतीही सखोल चौकशी केली जात नाही. उलट माझ्या जातीच्या प्रमाणपत्राचा तपास करण्यात पोलीस गुंतले आहेत. माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास योग्य दिशेने होतोय असे मला वाटत नाही, असे सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी म्हटले आहे.

रामा काणकोणकर यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी करंझाळे येथे प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी जेनिटो कार्दोज याच्यासह इतर संशयिताना अटक केली होती. सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी जातीचे प्रमाणपत्र तपासून त्यानुसार गुन्हा नोंद केला होता. माझ्या जबाबात पोलिसांना मी दोन राजकारण्यांचीही नावे दिली होती. या राजकारण्यांची चौकशी होण्याची गरज आहे. ती अद्याप झाली नसल्याने तपास योग्य दिशेने होतोय असे म्हणता येणार नाही. रामा काणकोणकर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. 

हेही वाचा