हरिश्चंद्र मडकईकर यांची उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

पणजी : राज्यात मागील काही दिवसांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर गुरुवारी पोलीस खात्यात मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात एक अधीक्षक, सहा उपअधीक्षक आणि ३४ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबत कार्मिक खात्यासह पोलीस मुख्यालयाने दोन वेगवेगळे आदेश जारी केले आहेत.
कार्मिक खात्याचे अवर सचिव रघुराज फळदेसाई यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांची उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांना अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त केले आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याकडे कोकण रेल्वे पोलीस अधीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक गुरुदास गावडे यांनी दोन वेगवेगळे आदेश जारी करून सहा पोलीस उपअधीक्षक आणि ३४ पोलीस निरीक्षकांची बदली केली आहे. त्यानुसार, उपअधीक्षक हिरू कवळेकर यांची कोकण रेल्वे उपअधीक्षकपदी, सुदेश वेळीप यांची उत्तर गोवा पोलीस उपअधीक्षकपदी, ब्रुटानो पाशीतो यांची दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) उपअधीक्षकपदी, नीलेश राणे यांची काणकोण उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), ब्राझ मिनिझीस यांची विदेशी क्षेत्रीय नोंदणी अधिकारी कार्यालय (एफआरआरओ) तर नूतन वेर्णेकर यांची मानवी तस्करी विरोधी पथक उपअधीक्षकपदी बदली केली आहे. त्यांच्याकडे महिला पोलीस अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
३४ पोलीस निरीक्षकांची बदली केली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांची काणकोण निरीक्षकपदी, पोलीस निरीक्षक हरीष राऊत देसाई (कोलवा वाहतूक विभाग), विजय राणे सरदेसाई (डिचोली पोलीस स्थानक), सिताकांत नाईक (शिवोली किनारी पोलीस स्थानक), महेश केरकर (पणजी वाहतूक विभाग) संदीप केसरकर आणि प्रज्योत फडते (दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथक) शैलेश नार्वेकर (वास्को विशेष विभाग), देवेंद्र पिंगळे (विदेशी क्षेत्रीय नोंदणी अधिकारी कार्यालय), सचिन लोकरे आणि महेश गडेकर (गुन्हा शाखा), नितीन हळर्णकर (पेडणे पोलीस स्थानक), दत्ताराम राऊत (मोपा विमानतळ वाहतूक विभाग), निनाद देऊलकर (मोपा विमानतळ पोलीस स्थानक), नारायण चिमुलकर (एटीएस पोलीस स्थानक), तुलसीदास नाईक (वाहतूक प्रशिक्षण विभाग), जाॅन फर्नांडिस (दाबोळी विमानतळ), अरूण बाक्रे (पणजी सुरक्षा विभाग), सचिन नार्वेकर (शापोरा किनारी पोलीस), गौरीश मळीक (जुने गोवा पोलीस स्थानक), कृष्णा सिनारी (पेडणे वाहतूक विभाग), गौरीश परब (फोंडा वाहतूक विभाग), विश्वजीत चोडणकर (पणजी विशेष विभाग), सगुण सावंत (अमली पदार्थ विरोधी पथक), सजित पिल्ले (पणजी किनारी पोलीस), मीरा डिसिल्वा (पणजी महिला विभाग), सतीश पडवळकर (गोवा राखीव दल), रीमा नाईक (पिंक पोलीस), नवीन देसाई (म्हापसा पोलीस स्थानक), सुजय कोरगावकर (डिचोली विशेष विभाग), निखिल पालेकर (एस्कोट विभाग म्हापसा), हरीष गावस (म्हापसा विशेष विभाग), प्रशल नाईक देसाई (केपे पोलीस स्थानक) आणि अर्जुन सांगोडकर यांची गुन्हा शाखेत बदली केली आहे.
हरिश्चंद्र मडकईकर यांची नियुक्ती
उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदी हरिश्चंद्र मडकईकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर, राहुल गुप्ता यांना अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. दक्षिण गोवा अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याकडे कोकण रेल्वे पोलीस अधीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला.