अबकारी विभागाची कारवाई

जोयडा : कारवार तालुक्यातील मुडगेरी धरण परिसरात अबकारी विभागाने जंगल मार्गाने गोव्याहून कर्नाटकात नेण्यात येत असलेला मोठा दारूसाठा जप्त केला. या छाप्यात एकूण १३,७६,७५० रुपये किमतीची दारू व वाहन जप्त करण्यात आले.
अबकारी अधिकाऱ्यांना पाहताच संशयितांनी वाहने सोडून पळ काढला. यावेळी अबकारी विभागाने घटनास्थळावरून पाच दुचाकी आणि एक कार ताब्यात घेतली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना शोधण्यासाठी अबकारी विभागाने विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.