डांबरीकरण करण्याची कंत्राटे दिली

पणजी : येत्या पंधरा दिवसांनंतर गोव्यातील कुठल्याही रस्त्यावर खड्डे (potholes on road) दिसणार नाहीत, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी सांगितले.
पीडब्ल्यूडीमार्फत राज्याच्या प्रत्येक मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या तसेच खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याच्या निविदा दिल्या आहेत. यात पणजी, मडगाव तसेच इतर शहरांतील रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे काम कंत्राटदाराने १५ दिवसांत करावे, अशी अट घातली आहे. विविध ठिकाणी कंत्राटदारांनी कामाला सुरुवातसुद्धा केली आहे.
यापूर्वी अशीच १५ दिवसांचे वेळ दिली होती, असा प्रश्न केला असता, मंत्री कामत यांनी सांगितले की, पावसामुळे खड्डे बुजविण्याचे काम रखडले होते. आता पाऊस नसल्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग येईल.