पर्यटन विभागाला पत्र लिहून कारवाईची मागणी

मडगाव : गोवा महिला मंचने (Goa Mahila Manch) २५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान गोव्यात (Goa) आयोजित होणाऱ्या 'कामसूत्रच्या कथा आणि ख्रिसमस सेलिब्रेशन' या प्रस्तावित कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.
पर्यटन विभागाला (Goa Tourism Department) पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
गोवा महिला मंच यांच्याकडून पर्यटन विभागाचे संचालक (Tourism Director) केदार नाईक यांना लिहिलेल्या पत्रात, गोव्यात अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा निषेध केला.
अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे गोवा लैंगिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होईल आणि कुटुंब पर्यटन स्थळ म्हणून गोव्याची प्रतिमा गंभीरपणे खराब होणार आहे.
गोव्याची प्रतिमा खराब करण्याच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून, या भगवान श्री रजनीश फाउंडेशनच्या कार्यक्रम शोधण्यासाठी आणि या प्रस्तावित कार्यक्रमाचे ठिकाण ओळखण्यासाठी गोवा पोलिसांकडे त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. ज्यात या कार्यक्रमात राहण्यासाठी आणि जेवणासाठी २४,९९५ रुपये घेण्यात येत आहेत.
गोवा महिला मंचाने पर्यटन खात्याला दिलेल्या पत्राच्या प्रती मुख्य सचिव, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना, गोवा पोलिसांच्या संबंधित जिल्हा एसपींना, गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि संचालक एआरझेड एनजीओ यांना पाठवण्यात आल्या असून कारवाईची मागणी केली आहे.