हजाराच्या कुपनावर कोट्यधीश होण्याची संधी!

चांदर येथे 'माउंट युथ असोसिएशन'तर्फे उद्यापासून देणगी कुपन्सचे वाटप; पहिले बक्षीस एक कोटी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
हजाराच्या कुपनावर कोट्यधीश होण्याची संधी!

मडगाव: आता फक्त एक हजार रुपयांच्या देणगी कुपनाची खरेदी करून कोट्यधीश होण्याची संधी नागरिकांना मिळाली आहे. चांदर येथील माउंट युथ असोसिएशनने आपल्या सुवर्ण महोत्सवी उत्सवाच्या निमित्ताने ही खास देणगी कुपन्स बाजारात आणली असून, याचे पहिले बक्षीस तब्बल एक कोटी रुपये आहे. 'थ्री किंग्ज उत्सवा'च्या पार्श्वभूमीवर हे 'गोल्डन ज्युबिली सेलिब्रेशन' केले जात आहे. समाजमाध्यमांद्वारे याच्या जाहिराती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असोसिएशनकडून सुरू आहे.




केवळ एक हजार रुपयांच्या देणगी कुपनावर नागरिकांना १ कोटी रुपयांची रक्कम जिंकण्याची संधी यामुळे मिळणार आहे. या १ कोटी रुपयांच्या पहिल्या बक्षिसाव्यतिरिक्त १० लाखांची दहा बक्षिसे जिंकण्याची संधी असल्याने, आणखी दहा कुपनधारकांना लखपती होण्याची संधी या योजनेमुळे मिळणार आहे.

या कुपन्सच्या वाटपाची सुरुवात २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता चांदर चर्चजवळच्या चांदर पंचायतीच्या सभागृहात होणार आहे. तर, १ कोटी रुपये जिंकणाऱ्या सहभागीचे नाव व इतर विजेत्यांची नावे ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर केली जातील. विजेत्यांची निवड करण्याचा हा कार्यक्रम यूट्यूबवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

हेही वाचा