रेड कार्पेटवर असेल 'हाती हाती पा पा', 'पापा बुका'चा जलवा!

पणजी: गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज, शनिवार २२ नोव्हेंबर रोजी दुसरा दिवस असून, आजचा दिवस चित्रपट रसिकांसाठी जबरदस्त पर्वणीसारखा असणार आहे! काल, २१ नोव्हेंबरला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी रेड कार्पेट आणि मास्टरक्लास सत्रांमध्ये आपली उपस्थिती लावत महोत्सवाला वेगळी उंची दिली. आजचा दिवस गाजणार आहे तो 'इंडियन पॅनोरमा'च्या वर्ल्ड प्रीमियर आणि आंतरराष्ट्रीय मास्टरक्लासेसमुळे.

इंडियन पॅनोरमामध्ये तीन चित्रपटांवर असेल नजर
आज इंडियन पॅनोरमा विभागात तीन जबरदस्त चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यात बंगाली, इंग्रजी, सिंहला आणि टोक पिसिन या भाषांमधील चित्रपट जागतिक स्तरावर आपली ओळख दाखवतील.
१) 'हाती हाती पा पा' (बंगाली): दुपारी १२:३० वाजता पणजी ऑडिटोरियम ३ मध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर (World Premiere) होणार आहे. (रेड कार्पेट: १२:०० ते १२:३० वाजता).
/indian-express-bangla/media/media_files/2024/12/14/YzrWC3AlCPx5gGLzKnZF.jpg)
२) 'स्पायिंग स्टार्स' (इंग्रजी आणि सिंहला): सायंकाळी ५:३० वाजता पणजी ऑडिटोरियम ४ मध्ये या चित्रपटाचा इंडिया प्रीमियर (India Premiere) होणार आहे.
३) 'पापा बुका' (टोक पिसिन आणि इंग्रजी): सायंकाळी ६:३० वाजता पणजी ऑडिटोरियम ३ मध्ये या चित्रपटाचा आशिया प्रीमियर (Asia Premiere) होणार आहे.
रेड कार्पेटवर आंतरराष्ट्रीय थाट
आजच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात विविध देशांतील चित्रपटांची झलक पाहायला मिळणार आहे, तसेच रेड कार्पेटवर ग्लॅमरचा तडका असणार आहे.
१) इटालियन/स्विस चित्रपट 'मस्किटोझ' (Mosquitoes) चा आशिया प्रीमियर आज सकाळी ११:३० वाजता होणार असून, दिग्दर्शक व्हॅलेंटिना बर्तानी आणि निकोल बर्तानींसह इतर प्रतिनिधी रेड कार्पेटवर उपस्थित असतील.
२) 'मुरिएल्स वेडींग' (Muriel’s Wedding) हा इंग्रजी चित्रपट 'रेस्टोर्ड क्लासिक्स' (Restored Classics) विभागात दुपारी २:४५ वाजता प्रदर्शित होईल.

३)फ्रेंच चित्रपट 'रेनोइर' (Renoir) आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सायंकाळी ४:३० वाजता सुवर्णमयूर पटकावण्यासाठी आपली दावेदारी सादर करेल.
४) 'कंट्री फोकस'मध्ये आज जपान आहे, संध्याकाळी ७:३० वाजता 'सीसाइड सेरेंडिपिटी' आणि 'टायगर' या जपानी चित्रपटांचे प्रदर्शन असेल.
मास्टरक्लासेसमध्ये 'क्रिएटिव्ह माइंड्स'चे मंथन
कला अकादमीमध्ये आज चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंवर मंथन होणार आहे:
१) 'अन्स्क्रिप्टेड' (Unscripted) - चित्रपट निर्मितीची कला आणि भावना: सकाळी ११:३० ते १:०० या वेळेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा आणि पटकथा लेखक अभिजात जोशी यांच्यासोबत हे सत्र रंगणार आहे.

२) 'एन युरेशियन फेस्टिवल फ्रंटियर' (AI युग): दुपारी २:३० ते ४:०० या वेळेत बर्लिन महोत्सवाच्या त्रिशिया टटल आणि IFFI चे फेस्टिवल डायरेक्टर शेखर कपूर यांच्यात 'एआय' (AI) युगातील सिनेमावर चर्चा होणार आहे.
३) 'मास्टरक्लास: श्वास आणि भावना' (Breath & Emotion): अभिनेते विनयकुमार (आदिशक्ती) हे सायंकाळी ४:३० ते ६:०० दरम्यान अभिनय आणि भावनांच्या समन्वयावर खास मार्गदर्शन करतील.