
पणजी: रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात संशयित जेनिटो कार्दोझच्या जामिनावरील युक्तिवाद आता २६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, या प्रकरणातील महत्त्वाचा फॉरेन्सिक अहवाल आणि तक्रारदार रामा काणकोणकर यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी अद्याप प्रलंबित आहे. या दोन्ही गोष्टी तपास पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असून त्यासाठी त्यांना अधिक वेळ हवा आहे. त्यानुसार, न्यायालयाने पोलिसांना वेळ मंजूर केला असून, पुढील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.