
सिने प्रेमींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा शुक्रवार अत्यंत खास ठरणार आहे. याआठवड्यात नवे चित्रपट आणि वेबसीरीज थिएटर्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. यामध्ये ‘तेरे इश्क मे’, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमार’ या चित्रपटांचा समावेश आहे.
तेरे इश्क में । थिएटर्स
धनुष आणि कृति सेनन ही जोडी प्रथमच दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या ‘तेरे इश्क में’ या म्युझिकल रोमँटिक ड्रामामध्ये झळकणार आहे. एक तुटलेली प्रेमकहाणी आणि इंटेन्स ड्रामा यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली आहे.
द पेट डिटेक्टिव । झी ५
शराफ उ धीन आणि अनुपमा परमेश्वरन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मलयाळम चित्रपटात टोनी नावाचा प्रायव्हेट डिटेक्टिव प्राण्यांचा शोध घेत असताना मोठ्या स्मगलिंग रॅकेटमध्ये अडकतो.
रेगई । झी ५
क्राइम थ्रिलर ‘रेगई’ची कथा सब-इन्स्पेक्टर वेत्रीभोवती फिरते. तपासादरम्यान तो वैद्यकीय क्षेत्रातील मोठे रॅकेट उघड करतो.
गुस्ताख इश्क । थिएटर्स
डिझायनर मनीष मल्होत्राचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट. विजय वर्मा, फातिमा सना शेख आणि नसीरुद्दीन शाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
द स्ट्रिंगर्स । नेटफ्लिक्स
साइगॉनच्या एका फोटो एडिटरची १० वर्षांची तपासयात्रा दाखवणारी ही डॉक्युमेंट्री व्हिएतनाम युद्धातील एक भव्य प्रतिमा उलगडते.
लेफ्ट हॅंडेड गर्ल । नेटफ्लिक्स
तैवानच्या एका सिंगल आई व दोन मुलींच्या संघर्षमय आयुष्याची कथा. शहरी जीवनाशी जुळवून घेण्याचा प्रवास या चित्रपटात दाखविला आहे.
आर्यन । नेटफ्लिक्स
सीरियल किलरला पकडण्यासाठी धडपडणाऱ्या एका धडाडीच्या पोलीस अधिकाऱ्याची ही इंटेन्स थ्रिलर कथा आहे. विष्णु विशाल आणि श्रद्धा श्रीनाथच्या भूमिका विशेष आकर्षण आहेत.
रक्तबीज २ । झी ५
२०२३ मधील बंगाली ‘रक्तबीज’चा हा सिक्वेल. आयबी ऑफिसर एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यासाठी तपासात गुंततो.
बॉर्न हंगरी । जिओ हॉटस्टार
भारतामधून दत्तक घेतलेल्या एका मुलाचा टॉप शेफ बनण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. कथा खऱ्या शेफ साश सिम्पसन यांच्या जीवनावर आधारित आहे.
स्ट्रेंजर थिंग्स सीजन ५ । नेटफ्लिक्स
सुपरनॅचुरल थ्रिलर सिरीजचा पाचवा सीजन आज प्रदर्शित होत आहे. हॉरर, अॅक्शन आणि सस्पेन्सचा धमाका पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. ही सिरीज सध्या केवळ ४ एपिसोडमध्ये उपलब्ध असेल.

सनी संस्कारी की तुलसी कुमार । नेटफ्लिक्स
वरुण धवन आणि जान्हवी कपूरची रोमकॉम आता ओटीटीवर उपलब्ध होणार आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.