रावणफोंडनजीक कचरा गोळा करणारी गाडी उलटून दोन कामगार जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
रावणफोंडनजीक कचरा गोळा करणारी गाडी उलटून दोन कामगार जखमी

मडगाव : वार्का पंचायत क्षेत्रातील कचरा संकलनासाठी जाणारा टेम्पो रावणफोंडनावेली रस्त्यावर उलटल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मडगाव येथील ईएसआय इस्पितळात उपचार सुरू आहेत.

नेसाय, सां जुजे दी आरियल येथील रिसायकल वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या कामगारांना घेऊन टेम्पो वार्काकडे जात होता. रावणफोंड सर्कलहून नावेली चर्चच्या दिशेने गाडी आली असता समोरून दुसरे वाहन आल्याने चालकाने टेम्पो बाजूला घेतला. दरम्यान टेम्पो स्लीप होऊन रस्त्याच्या कडेला उलटला.

या अपघातात गाडीतील चार कामगारांपैकी दोघे गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना उपचारासाठी इएसआय इस्पितळात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे

हेही वाचा