ओटीटीवर काय पहाल?

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
ओटीटीवर काय पहाल?

जूनच्या अखेरच्या आठवड्यात ‘स्क्विड गेम ३’, ‘पंचायत ४’ सारख्या वेबसीरीज प्रदर्शित झाल्या समावेश आहे. या सिरीजसोबतच इतरही वेब सिरीजना प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.


मिस्ट्री । जीओहाॅटस्टार
राम कपूर आणि मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिकेत असलेली नवी वेबसीरीज ‘मिस्त्री’ ही २७ जूनपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. ही मालिका लोकप्रिय इंटरनॅशनल शो ‘मोंक’चा भारतीय अवतार आहे.


विराटपलेम : पीसी मीना रिपोर्टिंग । झी ५
२७ जूनपासून झी ५ वर प्रदर्शित होणारी ही नवीन तेलुगु सीरीज एका रहस्यमय गावाची कथा सांगते, जिथे नवविवाहित महिलांचे विचित्र पद्धतीने मृत्यू होत आहेत. गावातील लोक यामागे जुना शाप असल्याचे मानतात. परंतु सत्याचा शोध घेण्याची जबाबदारी एका प्रामाणिक महिला पोलीस 'पीसी मीना'वर आहे.


स्मोक । अॅपल टिव्ही +
‘स्मोक’ ही एक थरारक वेबसीरीज असून ती सत्य घटनेवर आधारित आहे. ही कथा एका आग लावणाऱ्या गुन्हेगार जॉन लिओनार्ड ऑरच्या गुन्ह्यांवर आधारित आहे. या मालिकेत एक तपास अधिकारी आणि एक गुप्तहेर एकत्र येऊन अमेरिकेच्या पॅसिफिक नॉर्थवेस्ट भागात सक्रिय असलेल्या दोन सिरीयल आग लावणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेतात. मात्र तपासाच्या ओघात ते दोघे एका घातक खेळात अडकतात, जो गुन्हेगारांनी रचलेला असतो.


क्लीनर । लायन्स गेट प्ले
‘क्लीनर’ ही एक हाय-वोल्टेज अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटाची कथा एका माजी सैनिकाभोवती फिरते, जो साफसफाईचे करण्याचे काम करतो. एके दिवशी एक ऊर्जा कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात, एका उंच टॉवरमध्ये, काही कट्टरपंथी कार्यकर्ते ३०० जणांना बंदी बनवतात. हे पाहून हा माजी सैनिक त्या सर्वांची सुटका करण्याच्या मोहिमेवर निघतो. त्यानंतर जो अ‍ॅक्शन आणि थ्रिलचा खेळ सुरू होतो, तो प्रेक्षकांना शेवटपर्यंत स्क्रीनला चिकटवून ठेवतो.