‘सारे जहाँ से अच्छा’ ते ‘वॉर २’ देशभक्तीने ओतप्राेत आठवडा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
14th August, 11:45 pm
‘सारे जहाँ से अच्छा’ ते ‘वॉर २’ देशभक्तीने ओतप्राेत आठवडा


ओटीटीवर गेल्या आठवड्यात अनेक उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातही काही बहुचर्चित व बहुप्रतीक्षित कलाकृती रिलीज होणार आहेत. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ऑटीटी आणि थिएटर्समध्ये ‘वॉर २’, ‘सारे जहाँ से अच्छा’ प्रदर्शित हाेणार आहे.


वॉर २ । थिएटर्स
हा चित्रपट, ‘वॉर’ (२०१९) चा सिक्वेल आहे, यात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत आणि कियारा अडवाणी आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटात ॲक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्सवर अधिक भर दिला गेला आहे.


सारे जहाँ से अच्छा । नेटफ्लिक्स
प्रतीक गांधी स्टारर हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा भारतीय गुप्तहेर विष्णू शंकर आणि आयएसआय एजंट मूर्तझा मलिक यांच्याभोवती फिरते.


तेहरान । झी ५
जॉन अब्राहम, नीरू बाजवा व मानुषी छिल्लर स्टारर ‘तेहरान’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रो​जी झी ५ वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा २०१२ मध्ये दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटांवर आधारित आहे.


अंधेरा । प्राइम व्हिडीओ
या हॉरर सीरिजमध्ये प्राजक्ता कोळी, सुरवीन चावला, प्रिया बापट व करणवीर मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.ही सिरीज १४ ऑगस्ट रो​जी प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.


कोर्ट कचेरी । सोनी लिव्ह
हा कोर्टरूम ड्रामा १३ ऑगस्ट रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित झाला आहे. त्यात आशीष वर्मा आणि पवन मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजची कथा तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडेल.


माँ । नेटफ्लिक्स
काजोलचा सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर चित्रपट ‘माँ’ १५ ऑगस्टपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड करू शकला नाही; परंतु त्याचा निर्मिती खर्च वसूल करण्यात तो यशस्वी झाला.


नाईट ऑलवेज कम्स । नेटफ्लिक्स
हा क्राइम ड्रामा १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री तिच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्वकाही पणाला लावते.


फिक्स्ड । नेटफ्लिक्स
‘फिक्स्ड’ हा कॉमेडी चित्रपट १३ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा कंटेंट इतका चांगला आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हाला खूप हसायला येईल.


लव्ह इज ब्लाइंड सीझन २ । नेटफ्लिक्स
‘लव्ह इज ब्लाइंड’चा दुसरा सीझन १३ ऑगस्ट रो​जी नेटफ्लिक्सवर झाला होणार आहे. या शोमध्ये जेसिका बॅटन, निक लाची, लॉरेन स्पीड, झनब जाफरी व कोल बार्नेट हे प्रमुख भूमिकेत आहेत.