खेकड्यांचे चमचमीत गोवन पद्धतीचे ‘तोणाक’

पावसाळा म्हटलं की खवय्यांना खुणावतात ते खेकडे. रविवार दुपार चमचमीत खेकड्यांवर ताव मारून सुशेगाद गेली की गोवेकर मनापासून सुखावतो. चला तर मग पाहुया अशीच एक चमचमीत रेसिपी आजच्या चाचमीत रविवारसाठीची...

Story: चमचमीत रविवार |
17 hours ago
खेकड्यांचे चमचमीत गोवन पद्धतीचे ‘तोणाक’

साहित्य :

खेकडे
अर्धा कप खोवलेला ओला नारळ
१ मोठा कांदा (पातळ चिरलेला)
एक गड्डा लसूण
एक इंच आले
चिंच
दीड चमचा गोवन गरम मसाला
अर्धा चमचा हळद पावडर
१ मोठा कांदा (बारीक चिरलेला)
१ चमचा तेल
पाणी
चवीनुसार मीठ
कोथिंबीर

कृती :

खेकडे छान साफ करून सुट्टे करून घ्या. कांदा, खोबरे, आले व लसूण थोड्याश्या तेलात तळसून घेऊन गरम मसाला आणि हळद त्यात घालून हे वाटण मिक्सरवर काहीसे जाडसरच असे वाटून घ्या. एका पातेल्यात थोडे तेल टाकून त्यात कांदा परतून घ्या आणि त्यात खेकडे शिजत ठेवा. शिजताना अगदी थोडे मीठ त्यात घाला. थोडासा वाटणाचा एक अर्धा चमचा त्यात टाकून जरासे पाणी घालून आता पातेले झाकून ठेवा. खेकडे शिजत आले की त्यात उरलेले सगळे वाटण टाका आणि जसे पातळ/दाट हवे असेल, तसे थोडे थोडे पाणी घाला. छान सगळे एकजीव करून घेऊन आता शेवटचे म्हणून वाटल्यास किंचितसे मीठ टाकून थोडी चिंच त्यात टाका आणि परतून घ्या. आता चांगली वाफ आली आणि पातेल्यातले तोणाक रटमटले की त्यावर कोथिंबीर भुरभूरवा. तयार आहे खेकड्यांचे चमचमीत गोवन पद्धतीचे तोणाक.


शिल्पा रामचंद्र 
मांद्रे