देश-विदेशात शिक्षणासाठी गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारचे पाठबळ

मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप ३० वरून ५०, आयआयटी, एम्स, एनआयटीसाठी नवी योजना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
देश-विदेशात शिक्षणासाठी गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारचे पाठबळ

पणजी : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी उच्च शिक्षणासाठी गोमंतकीय विद्यार्थ्यांना देशात आणि विदेशात शिक्षण घेण्यासाठी नव्या योजना तयार केल्या आहेत. उच्च शिक्षण संचालनालयाकडून लवकरच ह्या योजनांची घोषणा होईल. विशेष म्हणजे सध्या असलेल्या मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ३० वरून ५० होणार आहे.


▪️ ‘मनोहर पर्रीकर शिष्यवृत्ती’ अंतर्गत

वार्षिक ५० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल.


▪️ विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती :

विदेशातील ५०० आघाडीच्या क्रमांकाच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना मर्यादित शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती केवळ पदवीपूर्व शिक्षणासाठी (Undergraduate) देण्यात येणार आहे.


▪️ ऑल इंडिया कोट्यातून निवड झालेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी ‘वन टाईम’ देण्यात येणारी शिष्यवृत्ती :

आयआयटी, एम्स, एनआयटी, जीएमसी सारख्या संस्थांमध्ये ऑल इंडिया कोट्यातून निवड झालेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना एकदाच शिष्यवृत्ती दिली जाईल.


गोव्यातील गुणवंत आणि पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठिंबा देण्यासाठी ह्या नव्या योजना तयार केल्या आहेत.

हेही वाचा