गोवा पोलीस दलातील ३७ पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान

ऑगस्टमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून गौरव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th August, 11:58 pm
गोवा पोलीस दलातील ३७ पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान

पणजी : पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी ऑगस्ट महिन्यात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या गोवा पोलीस दलातील ३७ कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमधून आणि विशेष विभागांमधून निवडण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांनी विविध गुन्हे उलगडणे, सायबर फसवणूक रोखणे, गुन्हेगारांना अटक करणे, अंमली पदार्थ जप्त करणे, पीडितांची सुटका करणे, जीव वाचवणे, तसेच क्रीडा आणि परेडमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली.

सन्मानित अधिकारी :

पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे (जीपीएस), पोलीस निरीक्षक अल्वितो रॉड्रिग्ज (वास्को वाहतूक शाखा), पोलीस निरीक्षक स्वप्निल किनळकर (मोपा विमानतळ),

पोलीस निरीक्षक राहुल नाईक (कोकण रेल्वे पोलीस), पोलीस निरीक्षक अनुष्का अ. पै (सायबर क्राईम), पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर (क्राईम ब्रँच), पोलीस निरीक्षक रझाशाद शेख (ईओसी पीएस), पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, महिला पोलीस निरीक्षक संध्या गुप्ता, पोलीस निरीक्षक विजय राणे सरदेसाई, पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर (साळगाव).

पोलीस निरीक्षक सजित पिल्लई (एएनसी), पोलीस निरीक्षक हैदर करोल (एमटी सेक्शन), पोलीस उपनिरीक्षक अमीर तारळ (हणजूण पोलीस चौकी), पोलीस उपनिरीक्षक साईश शेटगावकर (हणजूण पोलीस चौकी),

पोलीस उपनिरीक्षक कृष्णा गावस (डिचोली पोलीस चौकी), पोलीस उपनिरीक्षक अतीकेश खेडेकर (फातोर्डा पोलीस चौकी), पोलीस उपनिरीक्षक शाहीन शेटये (पणजी पोलिस चौकी), पोलीस उपनिरीक्षक अरुण शिरवईकर (पर्वरी पोलीस चौकी), पोलीस उपनिरीक्षक रश्मिर परब (डिचोली पोलीस चौकी).

महिला पोलीस उपनिरीक्षक जसविता नाईक (ओल्ड गोवा पोलीस चौकी), पोलीस उपनिरीक्षक दिप्तराज गावडे (ओल्ड गोवा पोलीस चौकी), पोलीस उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर, पोलीस उपनिरीक्षक दिपेश शेटकर, पोलीस उपनिरीक्षक राजाराम बागकर, पोलीस उपनिरीक्षक साईश शेटगावकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाळयेकर, पोलीस उपनिरीक्षक पंढरी चोपडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिनदयाल रेडकर (एएनसी),

पोलीस कॉन्स्टेबल- रघुनाथ नवलकर आणि पोलीस कॉन्स्टेबल केतन गावडे (पर्यटन पोलीस), पोलीस कॉन्स्टेबल राम सूर्यवंशी आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल अमित राणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रज्योत नाईक, पोलीस कॉन्स्टेबल प्रितम मलिक, पोलीस कॉन्स्टेबल दीपेन साळगावकर, पोलीस कॉन्स्टेबल पुनीत यादव.

पोलीस दलाची प्रतिमा उजळली : महासंचालक

पदक मिळविलेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी गोवा पोलीस दलाच्या व्यावसायिक उत्कृष्टतेचे आणि जनसेवेप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतिक आहे. त्यांच्या कार्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उजळली आहे, असे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.