शापोरातील चोरी प्रकरणी पाच जणांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
शापोरातील चोरी प्रकरणी पाच जणांना अटक

म्हापसा : शापोरा येथील बाबाजी दाभोळकर यांच्या स्टोअररूममधून बॅटरी व इतर वस्तू मिळून ७० हजारांच्या मालाची चोरी करण्यात आली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

अटक केलेल्या संशयितांमध्ये इरफान अहमद (२०, रा. हरमल, मूळ उत्तर प्रदेश), टफीम बक्रीदी (२०, रा. हरमल, मूळ उत्तर प्रदेश), सविता सुनिल लमाणी (३०, रा. हरमल मूळ गदग कर्नाटक), गीता रमेश नायक (३५, हरमल, मूळ गदग कर्नाटक) व श्रृती रवि कारभारी (२५, रा. हरमल, मुळ गदग कर्नाटक) यांचा समावेश आहे.

चोरीची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. दरम्या घडली होती. संशयित आरोपींनी फिर्यादींचा शापोरा जेटीजवळ असलेला स्टोअररूम फोडला. स्टोअररुमच्या आत शिरून एक बॅटरी, पाच नग नट बोल्ट, आठ नग शकल, एक विंग लेग, ३ नग व्हील स्टँड, सहा बोर्डसह केबल वायर मिळून ७० हजारांच्या वस्तू चोरून नेल्या.

चोरीचा प्रकार फिर्यादी दाभोळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी हणजूण पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी संशयितांना २९ रोजी सायंकाळी पकडून अटक केली.